यामध्ये प्रामुख्याने मुळव्याध हा आजार गर्भधारणेच्या काळामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पोटातील प्रेशर वाढल्यामुळे मलाशयावर दाब येतो व पोट साफ होण्यास त्रास होतो. गर्भधारणेमध्ये व नंतर मुळव्याधीचा फिशर हा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो. गर्भधारणेच्या काळात गर्भाच्या योग्य वाढीकरिता आवश्यक औषधोपचार जसे की, जीवनसत्वे व लोहाच्या गोळ्या व इतर औषधी यांच्या सेवनामुळे मलबद्धता होते आणि मलबद्धतेमुळे मुळव्याध उत्पन्न होतो. लक्षणांमध्ये शौचानंतर आग होणे किंवा वेदना होणे, रक्तस्राव थेंब थेंब किंवा लागून येणे, सुज असणे, खाज येणे, पोट साफ न होणे, कुंथावे लागणे, अपचन, गॅसेस होणे, शौचाच्या ठिकाणी कोंब लागणे, शौच्याच्या ठिकाणी जखम होणे, गाठ लागणे इत्यादी लक्षणे आढळतात.
गर्भधारणेमध्ये मुळव्याध झाल्यास अथवा होऊ नये म्हणून पुढील काळजी घ्यावी
» गर्भवती स्त्रीने डाव्या अंगावर झोपावे.
» पाणी अधिक प्यावे.
» भुक लागल्यावर जेवण करावे, भुक मारू नये. » फळे व भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे.
» दररोज पायी फिरण्यासारखा व्यायाम करावा. » सुज व वेदनेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने मलम लावावा.
» वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्यात बसावे.
मलबद्धतेसाठी:
- डॉक्टरांच्या सल्ल्याने पोट साफ होण्यासाठी औषध घ्यावे. गरज पडल्यास इनिमा घ्यावा.
- जेवणात दूध, तुपाचा वापर अधिक करावा. जेवणानंतर ताक प्यावे.
- जेवणानंतर लगेच झोपू नये.
- उपवास करू नये.
- मलबद्धता होणार नाही याची काळजी घ्यावी. जसे मैद्याचे पदार्थ टाळावेत तर तंतुमय पदार्थांचे सेवन अधिक करावे.
- शौचास कंथू नये.
- रात्री लवकर झोपावे व सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. नैसर्गिकपणे पोट साफ होते.
- रोज रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तुप टाकून प्यावे
ज्यांना मुळव्याधीचा त्रास आहे. अशा गर्भवती स्त्रीने पुढील गोष्टी करू नये:
- बाजरीची भाकरी खावू नये.
- अंडी, मटन, मासे खावू नये. तेलकट व मसालेदार पदार्थ खावू नये.
- तुर, हरबरा, वांगी, गवार खावू नये.
- शेवग्याची शेंग खावू नये.
- शाबुदाना, पोहे खावू नये.
- रात्री जागरण करू नये.
- चहा, कॉफी, कोल्ड्रॉक्स टाळावे.
गर्भवती स्त्रीयांमध्ये मुळव्याधीची शस्त्रक्रिया करणे शक्य नसते. त्वामुळे ज्या स्त्रीयांना अगोदरपासूनच मुळव्याधीचा त्रास आहे, त्यांनी गर्भधारणा राहण्यापूर्वीच मुळव्याधीचा उपचार तज्ञ डॉक्टरांकडून करणे गरजेचे असते. अन्यथा पूर्ण नऊ महिने त्रास सहन करणे क्रमप्राप्त ठरते.
—
डॉ. सौ. उर्मिला घोडके
स्त्री मुळव्याध तज्ञ मो. 8459313196
घोडके हॉस्पिटल, शांताई हॉटेलच्या पाठीमागे, जालना रोड, बीड.